Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घर सजवा राशीनुसार...

Updated: शनिवार, 18 नोव्हेंबर 2017 (14:36 IST)
मिथून:
मिथून राशीच्या व्यक्तीला फिकट हिरवा, निळा व लाल रंग शुभ असतो. खोल्यांना ते हे रंग देऊ शकतात. या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ असते. त्यांच्यासाठी उत्तर-पश्चिम (वायव्य) दिशेला कमी वजनाचे फर्निचर ठेवणे फायदेशीर असते.

कर्क:
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी पांढरा, क्रिम रंग शुभ आहे. कारण हे रंग चंद्रासारखे दुधाळ, पांढरे असतात. मात्र कर्क राशी ही जल तत्त्व असल्याने खोलीच्या उत्तर-पूर्व (ईशान) दिशेच्या कोपर्‍यात पाण्याने भरलेला माठ किंवा वाहत्या पाण्याचे चित्र लावले पाहिजे.

सिंह:
सिंह राशीच्या व्यक्तीसाठी पांढरा, ‍चमकणारा पिवळा रंग शुभ आहे. या रंगाचे कपडे किंवा सजावटीच्या वस्तू ते घरात ठेवू शकतात. अशा व्यक्तींसाठी घरातील कोपरा महत्त्वपूर्ण असतो. दक्षिण-पूर्व (आग्नेय) दिशेला किचन असावे कारण या राशीच्या व्यक्तीची आगी संबंधी अपघात होऊ शकतो.

कन्या:
कन्या राशीच्या व्यक्तीसाठी फिकट हिरवा, निळा व लाल रंग शुभ आहे. या रंगाचे कपडे परिधान करावे. तसेच घर सजवताना या रंगाच्या वस्तूंचा अधिक वापर केला पाहिजे. खोलीच्या दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) कोपर्‍यात वजनदार फर्निचर किंवा इतर सामान ठेवला पाहिजे. असे केल्याने घरात आंनदी वातावरण नांदते.

तूळ:
कुठलाही चकणारा रंग तूळ राशीसाठी शुभ आहे. घरातील पडदे, सोफा कव्हर तसेच पिलो कव्हरसाठी हा रंग वापरू शकता. त्यांच्यासाठी उत्तर-पश्चिम (वायव्य) कोपरा शुभ असल्याने कमी वजनाच्या वस्तू किंवा सजावटीच्या वस्तू ठेवू शकता. असे केल्याने त्यांच्या जीवनात कुठल्याच समस्या उद्‍भवत नाहीत.

वृश्चिक:
वृश्चिक राशीसाठी लाल, गुलाबी व भगवा रंग शुभ आहे. या राशीच्या व्यक्तीने मोठ्या प्रमाणात याच रंगाची कपडे, दागिने परिधान केली पाहिजेत. महिला या रंगाची टिकली कपाळावर लावू शकतात. उत्तर-पश्चिम (ईशान्य) दिशेला पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. चांदीच्या घागर पाण्याने भरून तिला मोत्याच्या माळांनी सजवले पाहिजे. असे केल्याने संततीचे शिक्षण, यश व समृध्दीसाठी सहकार्य मिळते.

धनू:
धनू राशीच्या व्यक्तींसाठी पिवळा रंग शुभ आहे. अग्नी किंवा अन्य ज्वलनशील पदार्थ नेहमी दक्षिण-पूर्व (आग्नेय) दिशेला ठेवावीत. तसेच आग्नेय दिशेच्या कोपर्‍यात दररोज दिवा प्रज्ज्वलित करून ठेवला पाहिजे.

मकर:
मकर राशी व्यक्तीला गळद निळा, हिरवा व काळा शुभ आहे. या रंगाची चादर, सोफा कव्हर, पडदे लाभदायी असतात. वजनदार फर्निचर किंवा इतर सामान दक्षिण दिशेच्या कोपर्‍यात ठेवले पाहिजे.

कुंभ:
कुंभ राशीसाठी गळद निळा, हिरवा व काळा रंग शुभ आहे. या रंगाचा उपयोग घराच्या भिंती, सजावटीच्या वस्तुंसाठी करू शकतो. असे केल्याने यशाचा मार्ग सापडतो. कमी वजनाचा सामान किंवा वस्तु नेहमी उत्तर-पश्चिम (वायव्य) दिशेला ठेवल्या पाहिजेत.

मीन:
मीन राशीला पिवळा रंग शुभ आहे. त्यामुळे घर सजवताना जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर केला पाहिजे. घराच्या उत्तर-पूर्व (ईशान्य) कोपर्‍यात पाण्याने भरलेला माठ अथवा वाहत्या पाण्याचे चित्र लावले पाहिजे. त्याने घरात लक्ष्मी नांदेल.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Happy Janmashtami Images श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी फोटो

Janmashtami 2026 : श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या ८ मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व दुःखे आणि अडचणी दूर होतील

गणपतीची मूर्ती घरात आणण्याआधी 'या' 7 गोष्टी नक्की तपासा

गणपतीच्या आधीच पुण्यात मोठा निर्णय; मिरवणुकीत लेझर लाइट वापरण्यावर निर्बंध

बुद्धीचा दाता गणपती बाप्पा! बुधवारी अशी करा विशेष आराधना, मिळतील शुभ फळ!

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments