गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तूच्या या पाच कारणांमुळे दूर होऊ शकतात तुमच्या सर्व अडचणी

बरेच प्रयत्न केल्यानंतर देखील तुम्ही कमावलेले धन वाचत नसेल आणि तुम्हाला सारखा त्रास होत असेल तर या समस्येपासून स्वत:ला दूर करण्यासाठी तुम्हाला वास्तुशास्त्रात दिलेले काही सोपे उपाय केले पाहिजे. यामुळे पैशांची तंगी तर दूर होईलच आणि घरात सुख शांती देखील येईल.  
 
अशोकच्या झाडाची एक लहान जड घेऊन ती देवघरात ठेवावी. रोज याची पूजा करा. असे केल्याने तुमच्या घरात कधीही पैशांची तंगी येणार नाही.  
 
कुबेर धनाचे स्वामी मानले जाते. हे एखाद्या गरीब व्यक्तीला धनवान बनवू शकतात. याची पूजा करणे किंवा याचे यंत्र तिजोरीत ठेवल्याने तुमची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही. कुबेर यंत्रामुळे तुमचे धन तिजोरीत एकदम सुरक्षित आणि त्यात वाढच होत राहते.   
 
आर्थिक त्रास दूर करण्यासाठी आपल्या घरातील ईशान कोपर्‍यात एखाद्या भांड्यात मीठ ठेवा. लक्षात असावे की मीठ साबूत असावे आणि त्याला सतत बदलत राहावे.  
 
तांब्याच्या भांड्यात पाणी भरून झोपताना आपल्या डोक्याजवळ ठेवा. यामुळे तुम्हाला उत्तम झोप लागते आणि सकारात्मक ऊर्जेचा निर्माण होतो. यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल आणि तुम्हाला पैशांची तंगी राहणार नाही.