1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 9 नोव्हेंबर 2017 (16:45 IST)

जेव्हा अचानक खिशातून पडायला लागतात पैसे तर मिळतात हे शुभ संकेत

vastu tips
नेहमी असे बघण्यात आले आहे की जेव्हा आम्ही एखाद्या कामासाठी बाहेर पडतो तर कपडे घालताना काही नाणे खाली पडतात. वास्तुशास्त्रानुसार यामागे बरेच शुभ संकेत लपलेले आहे. हे संकेत येणार्‍या दिवसांमध्ये तुमच्यासाठी शुभ ठरू शकतात.  
 
कपडे घालताना किंवा कामानिमित्त बाहेर जाताना जर हे नाणे पडत असतील तर हे शुभ संकेत असतात. असे मानले जाते की येणार्‍या दिवसांमध्ये तुम्हाला धन प्राप्तीचे योग आहे.  
 
जर देवाण घेवाणच वेळेस पैसे देताना हातातून पैसे सुटून जमिनीवर पडतात तर याला शुभ संकेत मानले जातात. याने असे संकेत मिळतात की भविष्यात होणारे सौदे तुमच्या पक्षात ठरतील आणि त्यामुळे धनलाभ होईल.  
 
तसेच दुसरी कडे घराबाहेर जाताना रस्त्यात पडलेला शिक्का मिळाला तर निकट भविष्यात लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहणार आहे असे संकेत मिळतात.