गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

अशा जागेवर असेल ऑफिस किंवा दुकान तर होते धनवर्षा, बघा कसे...

जर तुम्ही दिवस रात्र मेहनत करत असाल आणि त्यानंतर देखील तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमचा व्यवसाय उत्तमरीत्या चालत नसेल तर याचे एक कारण तुमची जमीन देखील असू शकते. वास्तू शास्‍त्रानुसार ज्या जागेवर तुमचे व्यावसायिक प्रतिष्ठान आहे आणि ती जागा दोषपूर्ण असेल तर तुम्हाला तुमच्या मेहनत आणि   योग्यतेनुसार लाभ मिळत नाही. म्हणून व्यवसाय किंवा फॅक्टरी स्थापित करण्याअगोदर जमिनीची योग्य चाचणी करून घेणे गरजेचे आहे.  
 
वास्तू विज्ञानानुसार अशा जागेवर फॅक्टरी उभारायला पाहिजे ज्या जागेत ओलावा असेल. शुष्क, बंजर आणि उबड खाबड जागा फॅक्टरीसाठी योग्य नाही आहे. अशा जागेवर फॅक्टरी लावल्याने नेहमी अडचण येत राहते. ज्या जागेवर फॅक्टरी स्थापित करत आहात, त्याचा आकार देखील फार महत्त्व ठेवतो.  
 
व्यावसायिक प्रतिष्ठानासाठी वर्गाकर आणि आयताकार जमीन शुभ असते. अशी जागा जी पुढून चौरस असेल आणि पाठीमागून अरुंद असते किंवा ज्या जमिनीचा उत्तर पूर्वी भाग मोठा असतो, ती देखील फॅक्टरी आणि व्यावसायिक प्रतिष्ठानासाठी लाभप्रद असते. इतर आकाराची जमीन व्यवसायासाठी हानिप्रद असते.  
 
व्यावसायिक फायद्याच्या दृष्टीने पूर्वोत्तर दिशेत मुख्य दार उत्तम असत. पूर्वोत्तर दिशेत मुख्य दार बनवण्यात त्रास होत असेल तर  ईशान कोपर्‍यात मुख्य दार बनवू शकता. यामुळे कर्मचार्‍यांसोबत चांगले संबंध राहतात, ज्याने त्यांचा पूर्ण साथ मिळतो.  
 
वास्तू विज्ञानानुसार आग्नेयमुखी दार व्यवसायासाठी चांगला नसतो. यामुळे सतत अडचण येत राहते. कर्मचार्‍यांसोबत ताण तणाव निर्माण होतो.