बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By वेबदुनिया|

वास्तू शास्त्राप्रमाणे साज-सज्जा!

घराची साज सज्जा बाहेरील असो किंवा आतील, ती आमच्या बुद्धी मन आणि शरीराला नक्कीच प्रभावित करते. घरातील वस्तू जर वास्तूप्रमाणे नसतील तर वास्तू आणि ग्रह राश्यांच्या विषमतेमुळे घरात क्लेश, अशांतीचा वास होतो. घराची बाहेरील साज सज्जा पाहुण्यांना आणि आतील साज सज्जा आमच्या मनाला प्रसन्नता देते. ज्याने सुख-शांती, सौम्यता प्राप्त होते. 

भवन बनवताना भवनच्या आतील खोल्यांचे उतार उत्तर दिशेकडे नसावे. असे असल्यास गृह स्वामी नेहमी ऋणी राहतो. ईशान्य कोपऱ्याकडे नाळी नसावी, याने खर्चात वाढ होते.

शौचालयाचे निर्माण ईशान्य कोपऱ्यात नसावे. याने सदैव दरिद्रता लागलेली असते. शौचायलचा निर्माण वायव्य दिशेत असले तर चांगले.