गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By वेबदुनिया|

Vastu Tips : भाड्याचे घर आणि वास्तू

भाड्याच्या घरात घरमालकाच्या स्वीकृतीशिवाय कुठलेही बदल करता येत नाही. असं बघण्यात आले आहे वास्तूच्या नियमांचे पालन केलेल्या घरात भाडेकरू सुखी आणि संपन्न राहतात. काही गोष्टींचे लक्ष्य ठेवले तर भाड्याच्या घरात राहून देखील वास्तूच्या नियमांचे पालन करू शकता जसे :
* घरातील उत्तर-पूर्वेचा भाग रिकामा ठेवावा.
* दक्षिण-पश्चिम दिशेकडे जास्त भार किंवा सामान ठेवू शकता.
* पाण्याचे सप्लाय उत्तर-पूर्वेकडे ठेवावे.
* बेडरूममध्ये पलंग दक्षिण दिशेकडे ठेवावे आणि झोपताना डोकं दक्षिणेकडे व पाय उत्तर दिशेत असावे. जर हे शक्य नसेल तर पश्चिम दिशेकडे डोकं ठेवू शकता.
* जेवण करताना नेहमी दक्षिण-पूर्वेकडे तोंड करून बसावे.
* पूजास्थळ नेमही उत्तर-पूर्व दिशेला स्थापित करावे, जर ते शक्य नसेल तर मात्र पाणी ग्रहण करताना तुमचे तोंड ईशान्य (उत्तर-पूर्व)कडे असावे.