विश्वाची त्रिमीती (लांबी, रुंदी व उंची) सर्व स्थापत्य वेदातील विषय आहेत, ब्रह्मांडातील ग्रहही यातून सुटलेले नाहीत. गेल्या भागात आपण सूर्य व पृथ्वीचा अभ्यास केला. इथे फक्त सूर्य आणि इतर ग्रह (चंद्र, मंगळ, बुध, शुक्र, गुरु, शनी) व छाया ग्रह (राहू केतू) यांच्या दशेचे वर्णन केले गेले आहे.
ग्रहांची दृष्टी
1. प्रत्येक ग्रह ज्या स्थानावर असतो त्याच्या सातव्या स्थानी त्यांची पूर्ण दृष्टी असते. 2. मंगळ जिथे राहतो तिथून चवथ्या, सातव्या व आठव्या स्थानावर त्याची दृष्टी असते. 3. गुरुच्या स्थानापासून पाचव्या, सातव्या व नवव्या स्थानावर त्याची नजर असते. 4. शनीच्या स्थानापासून तिसर्या, सातव्या व दहाव्या स्थानावर तो पूर्ण लक्ष ठेवतो.
प्रत्येक ग्रह ज्या जागी, ज्या राशीत बसतो त्यानुसार त्या ग्रहाचे शुभाशुभ फळ मिळते. ग्रहांची एक चरण, द्विचरण दृष्टी असते त्यासाठी बारीक निरीक्षण व अभ्यासाची गरज आहे.
ग्रहांचे थोडक्यात विवेचन
ग्रहांचे नाव
ग्रहांच्या राशी
ग्रहांची नक्षत्रे
ग्रहाचा कालावदी एका राशीतला
ग्रहांचे रंग
रत्न
सुर्य
सिंह
कृतिका, उत्तरा, उत्तराषाढा
एक महिना
मोतिया
माणिक
चंद्र
कर्क
रोहीणी, हस्त, श्रवण
सव्वादोनं महिने
पांढरा
मोती
मंगळ
मेष, वृश्चिक
मृग, चित्रा, घनिष्ठा
दिड महिना
लाल
रत्न
बुध
मिथुन, कन्या
अश्लेषा, ज्येष्ठा, रेवती
पावणेदोन महिने
हिरवा
पाचू
शुक्र
वृषभ, तुळ
भरणी, पूर्वा, पूर्वाषाढा
पावणेदोन महिने
पांढरा
हिरा
गुरु
धनु, मीन
पुनर्वसु, विशाखा
तेरा महिने
पिवळा
पुष्कराज
शनी
मकर, कुंभ
पुष्य, अनुराधा, उत्तर भाद्रपदा
अडीच महिने
काळा
निलम
राहू
आर्दा, स्वाती, शततारका
दिड वर्ष
तपकिरी
गोमेद
केतू
अश्विनी, मघा, मूळ
दिड वर्ष
तपकिरी
स्फटीक
घराचा होरा :- घराच्या आतल्या रचनेनुसार त्याच्या कारक ग्रहांचे फळ समजले पाहिजे. जसे देवघरात, कोठीघर बांधले असेल तर ते गुरु-शनीच्या युतीचे फळ आहे. जर बैठक खोलीच्या जवळ शौचालय असेल तर ते बुध व केतूच्या युतीचे फळ आहे.