शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

विवाहयोग्य मुला-मुलींचं बेडरुम कसं असावं?

तारुण्यात मन फार चंचल असते. नेहमी नवीन गोष्टींकडे मन नेहमी आकर्षित होत. वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते. अशा वेळी अनेकदा चुकीच्या दिशेकडे विचार वळू लागतात, जे भविष्य आणि आरोग्यासाठी धोकादायक असतात. यामुळे तारुण्य आणि लग्नापूर्वी मन चुकीच्या दिशेकडे भरकटणार नाही याकडे लक्ष द्यावे. मनावर नियंत्रण ठेवावे. काय करता येईल यासाठी टाकुयात एक नजर....

बेडरुममध्ये अशा वस्तू ठेऊ नयेत, ज्यामुळे लग्नापूर्वी कामवासना वाढेल. जेव्हा या भावना एका मर्यादेपेक्षा जास्त वाढू लागतात तेव्हा अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. बेडरुममध्ये कामुक फोटो लावू नयेत. एकांतामध्ये असे फोटो मन विचलित करतात.

वास्तुशास्त्रानुसार पलंग चांगला असला तरी त्यावर झोपणाऱ्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमण्यात अडचण येत असेल किंवा दुसरी एखादी अडचण असले तर त्यांच्या पलंगाखाली वास्तुदोष निर्माण करणारी वस्तू ठेवण्यात आलेली असावी. जर पलंगाच्या खाली वास्तुदोष असेल तर विविध प्रकारचे मानसिक तणाव निर्माण होतात. मनुष्य व्यर्थ गोष्टीच्या चिंतेत राहतो.

WD

लोखंडाचे सामान, जास्त वजन असलेले सामान, वापरात न येणाऱ्या वस्तू, पलंगाखाली स्वच्छता नसणे, औषधे ठेवणे, अधार्मिक वस्तू या सर्व कारणांमुळे वास्तुदोष निर्माण होतो.

WD


विवाह योग्य मुलगा किंवा मुलगी ज्या पलंगावर झोपतात, त्या पलंगाच्या खाली लोखंडाच्या वस्तू किंवा बिनकामाचे, व्यर्थ सामान ठेऊ नये. या वस्तूंमुळे वास्तुदोष निर्माण होतो. या वस्तूंमुळे अविवाहित लोकांचे मन चुकीच्या दिशेने भरकटते.
वास्तुशास्त्र सकारात्मक आणि नकरात्मक उर्जेच्या सिद्धांतावर कार्य करते. त्यामुळे अशा वस्तूंमुळे नकारात्मक प्रभाव वाढतो, ज्यामुळे तरुणांच्या विचारात नकारात्मकता निर्माण होते.

WD


पलंगाच्या खाली वास्तुदोष असल्यास वाईट स्वप्न पडतात, विचार अशुद्ध होतात. अधार्मिक कृत्य करण्याचे विचार मनात येतात.