Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Updated: सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (17:40 IST)
 
स्वच्छ किचन कोणाला आवडत नाही मात्र प्रश्र्न असा आहे की किचन साफ कसे ठेवणार. तुम्हाला माहीत आहे का किचन साफ करण्याची पद्धत असते. अनेक महिला अशा असतात ज्यांना जेवण बनवताना किचन साफ ठेवण्याची सवय असते. मात्र काही महिला अशा असतात ज्या जेवण बनवताना सगळीकडे पसारा करून ठेवतात. आम्ही सांगत आहोत अशा काही टिप्स ज्या तुम्हाला किचनमध्ये साफसफाई  ठेवण्यास मदत करतील.
 
किचनच्या टाईल्स साफ करण्यासाठी भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणार्‍या स्क्रबरला साबण लावून त्याने भिंती धुवा. टाईल्स स्वच्छ होतील. टाईल्स साफ करण्यासाठी तुम्ही ब्लीच, अमोनिया, बेकिंग सोडा तसेच व्हिनेगारचाही वापर करू शकता.
 
सिंक साफ करण्यासाठी आणि त्यात ग्रीस चिकटले असल्यास त्यात गरम पाणी टाका. यात तुम्ही व्हिनेगार आणि बेकिंग सोडा टाका. सिंक नव्यासारखे चमकू लागेल.
 
किचनमध्ये ठेवला जाणारा कचर्‍याचा डबा नेहमी स्वच्छ ठेवा. त्यातील पिशवी दररोज बदला.
 
फ्रीजची सफाई करण्यासाठी एका मगमध्ये गरम पाणी घ्या. त्यात थोडासा बेकिंग सोडा टाका. या मिश्रणाने फ्रीज साफ करा. यामुळे फ्रीज साफ होईलच तसेच त्यात किटाणू राहणार नाहीत. 
 
किचनचे कॅबिनेट्‌स साफ करण्यासाठी व्हिनेगार आणि लिक्विड सोपचा वापर करा. व्हिनेगार आणि लिक्विड सोप एकत्रित करून घ्या. याने कॅबिनेट्‌स स्वच्छ करा. कॅबिनेट्‌स एकदम स्वच्छ दिसतील.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

रक्षाबंधन खास प्रसंगी भावासाठी बनवा पारंपरिक आणि पौष्टिक ''मूग डाळ बर्फी''

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुकांचे पाणी प्या; आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

BPharma 12 वी नंतर बॅचलर ऑफ फार्मसीमध्ये मध्ये करिअर बनवा, पात्रता, पगार व्याप्ती जाणून घ्या

महागड्या केमिकल हेअर कलर्सना निरोप द्या, हा घरगुती हेअर डाय घरीच बनवा

ओमेगा ३ च्या कमतरतेमुळे शरीरात या ५ समस्या उद्भवू शकतात, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

पुढील लेख
Show comments