कडबोळी भाजणी
साहित्य:
1 किलो तांदूळ, 200-200 ग्राम हरभरे आणि सालासकट उडीद डाळ, 1 कप गहू, 50 ग्राम धणे, 2 चमचे जिरे
कृती:
सर्व साहित्य वेगवेगळे मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे. काळपण होयपर्यंत भाजू नये नाहीतर कडवटपणा येऊ शकतो. भाजून गार झाल्यावर एकत्र करून सरसरीत दळून घ्यावे.