सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: रविवार, 13 जून 2021 (17:21 IST)

नारळाच्या ग्रेव्हीची भेंडी

भेंडीची भाजी बऱ्याच पद्धतीने बनवतात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली भेंडी चव बदलते.आज आम्ही आपल्याला नारळाच्या ग्रेव्हीची भेंडीची भाजी बनवायची कृती सांगत आहोत,चला तर मग जाणून घेऊ या.
 
 
साहित्य -
5 कप भेंडीचे लांब केलेले काप,3 चमचे तेल,1 चमचा आलं बारीक केलेलं,1 चमचा लसूण,3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या,1 कांदा बारीक चिरलेला,1 चमचा तिखट,1 चमचा धणेपूड,1/2 चमचा हळद,कडीपत्ता,मीठ चवीप्रमाणे,2 कप  नारळाचं दूध. 
 
 
कृती- 
सर्वप्रथम कढईत तेल गरम करा,भेंडी घालून मध्यम आचेवर10 मिनिटे  परतून घ्या. नंतर काढून घ्या. कढईत त्याच तेलात आलं,लसूण,कडीपत्ता,आणि कांदा ,लाल,तिखट,हळद,धणेपूड,भेंडी आणि मीठ घालून परतून घ्या. या मध्ये नारळाचं दूध ,मिसळा आणि  2 मिनिटे  शिजवा.गरम नारळाच्या ग्रेव्हीची भेंडी सर्व्ह करा.