suvichar
✕

''दडपे पोहे'' अतिशय चवदार आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन नाश्ता Dadpe Pohe Recipe

Updated: सोमवार, 5 ऑक्टोबर 2026 (13:11 IST)
साहित्य-
पातळ पोहे: २ वाट्या
ओले खोबरे (किसलेले): १/२ वाटी
कांदा: १ मध्यम (बारीक चिरलेला)
लिंबाचा रस: १ ते २ चमचे
साखर: १ चमचा
मीठ: चवीनुसार
कोथिंबीर: बारीक चिरलेली (२ ते ३ चमचे)

फोडणीसाठी-
तेल: २ चमचे
मोहरी: १/२ चमचा
जिरे: १/२ चमचा
हिंग: १ चिमूट
हिरव्या मिरच्या: २ ते ३ (बारीक चिरलेल्या)
कढीपत्ता: ८-१० पाने
शेंगदाणे: २ चमचे

कृती-
पोहे तयार करणे: एका मोठ्या भांड्यात पातळ पोहे घ्या. (पोहे धुवायचे नाहीत). त्यात बारीक चिरलेला कांदा, किसलेले ओले खोबरे, लिंबाचा रस, साखर, मीठ आणि कोथिंबीर घाला. हे सर्व साहित्य हाताने हलक्या हाताने एकत्र चोळून मिक्स करा, जेणेकरून कांदा आणि खोबऱ्याच्या ओलाव्याने पोहे मऊ होतील.
ALSO READ: Cucumber Poha उन्हाळ्यात ट्राय करा थंडगार काकडी पोहे; सोशल मीडियावर रेसिपी व्हायरल
फोडणी तयार करणे: लहान कढईत किंवा फोडणीच्या पात्रात २ चमचे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात शेंगदाणे घालून मंद आचेवर छान कुरकुरीत तळून घ्या. त्यानंतर मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घाला. ही गरम फोडणी तयार केलेल्या पोह्यांच्या मिश्रणावर घाला.
आता भांड्यावर घट्ट झाकण ठेवा आणि वर काहीतरी जड वस्तू ठेवा किंवा हाताने ५ ते १० मिनिटे दाबून (दडपून) ठेवा. यामुळे पोहे छान वाफेवर मऊ होतात आणि सर्व चव पोह्यांमध्ये उतरते. १० मिनिटांनंतर झाकण काढून पोहे पुन्हा एकदा हलक्या हाताने मोकळे करा. वरून थोडे ओले खोबरे, कोथिंबीर आणि हवे असल्यास बारीक शेव/डाळिंबाचे दाणे घालून गरमागरम चहा सोबत सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: फक्त १० मिनिटांत बनवा, चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता 'मसाला ब्रेड पोहे'

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

लग्नापूर्वी प्रत्येक नवरीने जाणून घ्याव्यात अशा ५ गोष्टी, ज्या कदाचित आई-वडीलही सांगणार नाहीत!

मुळ्याची पाने फेकून देऊ नका! बनवा खमंग आणि कुरकुरीत 'मुळा पत्ता भजी'

Rose Vanilla Cake Squares सुगंधी आणि खूप चविष्ट रोझ व्हॅनिला केक स्क्वेअर्स रेसिपी

लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची का खावी? तज्ञ सांगतात 'ही' मोठी कारणे!

Guru Nanak Jayanti 2026 Wishes गुरू नानक जयंती शुभेच्छा संदेश

पुढील लेख
Show comments