शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (16:55 IST)

घरीच तयार करा चविष्ट इडली बर्गर

मुलांना काही नवीन आणि चविष्ट खाणं आवडतं इडल्या जास्तीच्या उरल्यावर त्याचे आपण मुलांसाठी इडलीचे बर्गर बनवू शकता.हे मुलांना नक्कीच आवडेल. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य- 
6 इडली,4 चमचे पुदिना आणि कोथिंबिरीची चटणी,3 टोमॅटो चिरलेले,4 कांदे चिरलेले,1 कप तेल,2 कप चिरलेल्या भाज्या (मटार,गाजर,बटाटे),1 चमचा मैदा,चिमूटभर हळद,1/2 चमचा तिखट,1/2 चमचा धणेपूड,1/2 चमचा गरम मसाला,1/2 चमचा आलं लसूण पेस्ट,1/2 चमचा कोथिंबीर बारीक चिरलेली.मीठ चवीप्रमाणे, तेल.
 
कृती- 
सर्वप्रथम तेल तापत ठेवा आणि इडली तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्या.
लक्षात ठेवा की इडली बाहेरून खुसखुशीत असावी आणि आतून मऊ.आता इडलीच्या एका बाजूस चटणी लावा.भाज्या पाण्यात उकळवून घ्या.पाण्यातून काढून थंड होण्यास ठेवा.कांदा,आलं लसूण पेस्ट,हळद,तिखट,धणेपूड,आणि गरममसाला घालून काही वेळ परतून घ्या आणि थंड होऊ द्या.
भाज्यांच्या मिश्रणाला मॅश करा त्यात मैदा,कोथिंबीर,मीठ घाला आणि मिसळा.इडलीच्या आकाराचे कटलेट तयार करा.कटलेट सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या.बर्गर सारखे करण्यासाठी कटलेट दोन्ही इडल्यांच्या मध्ये ठेवा आणि त्याच बरोबर टोमॅटो आणि कांद्याचे काप ठेवा. बर्गर सॉस सह सर्व्ह करा.