बाजरीची भाकरी- रेसिपी लिहून घ्या
भारतीय जेवणपद्धतीत बाजरीच्या भाकरीचे महत्व आहे. भाकरी ही हिवाळ्यात आरोग्यासाठी चांगली असते. बाजरीची भाकरीचे सेवन मानवी शरीरातल हाडांना मजबूत करते. तसेच संधिवात, हृदयाचे आजार, अर्थाइटिस, ब्लड प्रेशर, ऑस्टियोपीनिया इतर आजारांचा धोका होण्यापासून वाचवते. यात असणारे पोषक तत्व कैल्शियम, मैग्नीशियम, फॉस्फोरस, फाइबर, विटामिन बी, मैंगनीज आणि अँटीऑक्सीडेंट हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतात. चला तर लिहून घ्या बाजरीची भाकरी- रेसिपी
साहित्य-
250 ग्रॅम बाजरीचे पीठ
चिमूटभर मीठ
कोमट पाणी
आवश्यकतेनुसार तूप
थोडा गूळ
कृती-
बाजरीच्या पिठात मीठ मिक्स करून कोमट पाण्याने हे पीठ मळुन गोळा बनवून घ्यावा. 10-15 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेऊन दया मग आता भिजवलेला गोळा चांगला मळुन त्याचे गोळे तयार करून घ्या. पोळपाटावर बाजरीचे थोडेसे पीठ टाकून एक गोळा ठेवा हाताने थापून भाकरी बनवा. मग भाकरी तव्यावर टाका व वरच्या बाजूने पाण्याचा हात फिरवावा. आता भाकरी दुसऱ्या बाजुने शेकली गेल्यावर पहिल्या बाजूने पलटवून दोन्ही बाजुने शेकुन घ्या. तसेच आता तवा काढून भाकरी गॅस वर चांगल्याप्रकारे शेकुन घ्या. भाकरी छान फुलल्यावर त्यावर तूप लावा व गरम गरम भाकरी सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik