गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (16:53 IST)

मिक्स व्हेजिटेबल कटलेट बॉल्स

साहित्य -
 
100 ग्रॅम बटाटे उकडून मॅश केलेले, 100 ग्रॅम मटार उकडून मॅश केलेली. 100 ग्रॅम फ्रेंच बीन्स, 100 ग्रॅम फ्लावर, 100 ग्रॅम गाजर उकडून बारीक चिरलेली, 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर,1 आल्याचा तुकडा किसलेला,3 -4 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, तेल, मीठ चवीप्रमाणे, 1 कप शेंगदाणा कूट,
 
 
कृती -  
 
सर्व जिन्नस बटाटे,मटार,गाजर,फ्लावर,फ्रेंच बीन्स, आलं, हिरव्या मिरच्या,कोथिंबीर, मीठ मिसळून हाताने चपटे कटलेट बनवा. हे कटलेट शेंगदाण्याच्या कुटात गुंडाळून घ्या. नॉनस्टिक तव्यावर दोन्ही बाजूने कटलेट खमंग शेकून घ्या. थोडं थोडं तेल सोडा. गरम कटलेट टोमॅटो सॉस सह सर्व्ह करा.