सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (09:20 IST)

काही सोप्या किचन टिप्स

* सामान्यत: पावसाळ्यात किंवा थंड हवेत मसाले खराब होऊ लागतात आणि त्यांची चव खराब होऊ लागते असं होऊ नये या साठी मसाले नेहमी काचे च्या बरणीत ठेवा आणि त्यामध्ये थोडं मीठ घालून ठेवा या मुळे त्यामध्ये जाळे लागणार नाही आणि मसाले चांगले राहतील.
किंवा मसाले फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता या मुळे आपले मसाले खराब होणार नाही. 
 
* तांदूळ,डाळी किंवा गव्हाचं पीठ घरात स्टोअर करून ठेवतो आणि डबा उघडा राहिला तर पावसाळ्यात या मध्ये कीड लगेच लागते. या पासून वाचण्यासाठी कडुलिंबाची पाने कांड्यांसह डब्यात ठेवून द्या कीड लागणार नाही.  
 
* लसूण जास्त काळ स्टोअर करण्यासाठी सोललेले लसूण हवाबंद डब्यात ठेवा. लक्षात ठेवा की हे लसूण ओलसर नसावे किंवा डबा देखील कोरडा असावा. हा हवाबंद डबा बंद करून फ्रीजमध्ये ठेवून द्या. जेव्हा देखील लसूण वापरायचे असेल या पूर्वी ते धुऊन घ्या. 
 
* कोथिंबीर जास्त काळ साठवून ठेवायची असेल तर कोथिंबिरीची मुळे कापून ठेवा नंतर एक हवाबंद डब्यात किचन पेपर टॉवेल अंथरून द्या. कोथिंबीर न धुता ठेवा. नंतर वरून देखील किचन पेपर टॉवेल घाला. हा पेपर आपण आठवड्यातून एकदा बदलून द्या. डबा बंद करून फ्रीजमध्ये ठेवा. कोथिंबीर 15 ते 20 दिवस ताजी राहते. 
 
* आलं लसूण पेस्ट काही महिने चांगली ठेवण्यासाठी आलं लसूण सोलून धुऊन घ्या पेपर टॉवेल ने चांगल्या प्रकारे कोरडे करा. या मध्ये अजिबात पाणी नसावं. चांगल्या प्रकारे पुसून वाळवून घ्या नंतर मिक्सर मध्ये वाटून घ्या. हे वाटण प्लॅस्टिक किंवा काचेच्या बरणीमध्ये घालून त्यामध्ये थोडंसं मीठ आणि दोन चमचे तेल घाला आपली इच्छा असल्यास व्हिनेगर देखील वापरू शकता.व्हिनेगर मुळे ह्या पेस्टचा रंग फिकट हिरवा होईल.आता हा हवाबंद डबा फ्रीज मध्ये ठेवून द्या आणि महिन्याभर हे आरामशीर वापरा.