बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 30 जानेवारी 2021 (22:51 IST)

चहासह न्याहारी साठी आंबटगोड पापडीचाट

संध्याकाळच्या न्याहारी सह काही चटपटीत खाण्याची इच्छा होते. दररोज आरोग्यवर्धक वस्तू खाऊन चव बिघडते. अशा परिस्थितीत घरातच पापडीचाट तयार करा. चटपटीत असण्यासह आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. कारण या मध्ये मकाची पापडी वापरली जाते. जे आरोग्यासाठी चांगली आहे. चला तर मग पापडीचाट बनविण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊ या. 
 
साहित्य -
 
1 कप मक्याचे पीठ,1/4  कप मैदा,1 मोठा चमचा हिरवी चटणी,1 मोठा चमचा चिंच गुळाची लाल गोड चटणी,1 टोमॅटो बारीक चिरलेला,1 उकडून चिरलेला बटाटा, 1 बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर बारीक चिरलेली,लाल तिखट, तळण्यासाठी तेल, मीठ चवीप्रमाणे.
 
कृती - 
 
मक्याच्या पिठाला आणि मैद्याला चाळून घ्या. त्यात मीठ आणि तेल घालून मळून घ्या. आता ह्याच्या लहान लहान लाट्या बनवून पातळ लाटून त्रिकोणाकारात कापून घ्या.गरम तेलात सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या.  
नंतर या पुऱ्या टिश्यू पेपर वर काढून जास्त तेल काढा. 
आता एका ताटलीत ह्या कुरकुरीत पापड्या ठेऊन त्यावर चिरलेला कांदा टोमॅटो आणि चिरलेले बटाटे घाला.
वरून दही, चटणी आणि चिंच गुळाची गोड चटणी , कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि मीठ घालून सर्व्ह करा.