गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (18:40 IST)

पौष्टिक सोया चंक्स चे चविष्ट कबाब

साहित्य - 
 
 1 कप सोया चंक्स,1/2 कप हरभरा डाळीचे पीठ, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 बारीक चिरलेली ढोबळी मिरची, 1 बारीक चिरलेली गाजर, 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट,1/2 चमचा हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट,1/2 लिंबाचा रस, 1/2 चमचा गरम मसाला, मीठ चवीप्रमाणे.
 
कृती - 
 
उकळत्या पाण्यात सोया चंक्स घालून पाण्यातून काढून घट्ट पिळून घ्या.हे चंक्स पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.त्यात हरभरा डाळीचे पीठ, कांदा, ढोबळी मिरची,गाजर,कोथिंबीर,हिरव्या मिरची ची पेस्ट,आलं लसूण पेस्ट,लिंबाचा रस,गरम मसाला मीठ घालून मिसळवून घ्या. हाताला थोडंसं तेल लावून कबाबचा गोल आकार द्या. 
नॉनस्टिक पॅन गरम करा मध्यम आंचेवर गॅस ठेवा. त्यामध्ये थोडं तेल घालून  त्यावर कबाब ठेवा आणि सोनेरी रंग येई पर्यंत शेकून घ्या. दोन्ही बाजूने कबाब सोनेरी झाल्यावर ताटलीत काढून घ्या. अशा प्रकारे सर्व कबाब तयार करा. सोयाचंक्स कबाब खाण्यासाठी तयार.गरम कबाब हिरव्या चटणी आणि सॉस सह सर्व्ह करा.