शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (21:57 IST)

चविष्ट पनीर पसंदा

शाकाहारी असणाऱ्यांना पनीरची भाजी आवडते. घरात नेहमी पनीरची भाजी बनतेच. मग ते शाही पनीर असो किंवा मटार पनीर. ज्याची चव बाहेरच्या रेस्तराँ सारखी नसते. बऱ्याच वेळा पनीरच्या भाजीचे तेच प्रकार खाऊन कंटाळा आला असतो. या साठी  आपण घरीच पनीर पसंदा बनवू शकता. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे. तसेच चविष्ट देखील आहे. चला तर मग साहित्य आणि कृती  जाणून घेऊ या.
 
साहित्य- 
300 ग्रॅम पनीर, 20 ग्रॅम बेदाणे,20 ग्रॅम काजू,20 ग्रॅम आरारूट, 20 ग्रॅम मैदा,500 मिली रिफाईंड तेल, चिमूटभर केसर, 2 चमचे क्रीम,मीठ चवीप्रमाणे.
 
ग्रेव्हीसाठी साहित्य- 
 
100 ग्रॅम कांदा,200 ग्रॅम टोमॅटो,  25 ग्रॅम काजू, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 2 ग्रॅम लाल तिखट,4 नग वेलची, 4 नग लवंगा,25 ग्रॅम मावा (खोया)
 
कृती- 
 
300 ग्रॅम पनीर पैकी थोड्या पनीरचे बारीक बारीक काप करून ठेवा.काजू, बेदाणे,केसर आणि मीठ घालून मिसळा. मैदा आणि आरारूट मध्ये मीठ आणि पाणी घालून दाटसर घोळ बनवून घ्या.हे मिश्रण पनीरच्या अर्ध्या तुकड्यांवर पसरवून द्या  आणि बाकीचे पनीरचे उरलेले काप सँडविच सारखे ठेवा एका कढईत तेल तापत ठेवा आणि पनीरचे सँडविच केलेले तुकडे घोळात बुडवून सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या.
कांदा,आलं लसूण पेस्ट बनवा यात टोमॅटो आणि काजूची पातळ पेस्ट घाला. कढईत थोडं तेल घालून लवंग वेलची घालून परतून घ्या आणि त्यामध्ये कांद्याची पेस्ट घाला.मिश्रण चांगल्या प्रकारे परतून घ्या लाल तिखट,मीठ,  मावा घाला आणि त्यात लागत लागत पाणी घालून एक उकळी घ्या. पनीर चे तुकडे त्रिकोणी कापून एका भांड्यात ठेवून वरून तयार ग्रेव्ही घाला ग्रेव्हीवर क्रीम घाला आणि पनीर पसंदा पोळी सह सर्व्ह करा.