Marathi Biodata Maker
✕

Mixed vegetable khichdi मुलांसाठी बनवा पौष्टिक अशी मिक्स व्हेजिटेबल खिचडी

Updated: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026 (15:28 IST)
साहित्य-
तांदूळ: ½ वाटी
मुगाची डाळ: ¼ वाटी (पिवळी किंवा सालीची पिवळी मूग डाळ पचायला उत्तम असते)
गाजर - २ चमचे
मटार - २ चमचे
फ्लॉवर/ब्रोकोली - २ चमचे
बटाटा - २ चमचे
पालक किंवा मेथीची पाने - ५-६ (बारीक चिरलेली)
साजूक तूप - १ ते २ मोठे चमचे
जिरे - ½ लहान चमचा
हिंग - एक चिमूटभर
हळद - ¼ लहान चमचा
आले-लसूण पेस्ट - ½ लहान चमचा (पर्यायी)
मीठ: चवीनुसार
पाणी: ३ ते ४ वाट्या (खिचडी मऊ होण्यासाठी)
ALSO READ: अस्सल मराठमोळी फोडणीची खिचडी आणि कढी पाककृती
कृती-
सर्वात आधी तांदूळ आणि मुगाची डाळ २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर १५ ते २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा (यामुळे खिचडी लवकर आणि मऊ शिजते). कुकरमध्ये १ ते २ चमचे साजूक तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे आणि हिंग टाका. जिरे तडतडल्यावर आले-लसूण पेस्ट घालून मंद आचेवर परता. आता यात हळद आणि सर्व बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर, मटार, बटाटा, फ्लॉवर, पालक) घाला. १-२ मिनिटे तुपावर चांगल्या परतून घ्या. भिजवलेले डाळ-तांदूळ पाण्यानिचरून कुकरमध्ये घाला आणि भाज्यांसोबत हलक्या हाताने १ मिनिट परता. आता यात ३ ते ४ वाट्या पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. (मुलांसाठी खिचडी घट्ट न ठेवता मऊ/पतली असावी, त्यामुळे पाण्याचे प्रमाण थोडे जास्त ठेवावे).  कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर ३ ते ४ शिट्ट्या काढून घ्या. कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर उघडा. चमच्याने किंवा मॅशरने खिचडी छान मऊ एकजीव करून घ्या. वरून थोडे साजूक तूप घालून कोमट असतानाच बाळाला खायला द्या.
ALSO READ: रात्रीची उरलेली खिचडी निरुपयोगी आहे असे समजू नका! काही मिनिटांतच नाश्त्यासाठी बनवा भन्नाट रेसीपी
महत्त्वाच्या टिप्स
लहान बाळांसाठी (८ ते १२ महिने): खिचडी शिजल्यानंतर मिक्सरमध्ये न फिरवता चमच्याने किंवा मॅशरने छान मऊ करा, जेणेकरून त्यांना अन्न चावण्याची सवय होईल.
चव वाढवण्यासाठी: तुम्ही यात चिमूटभर मिरेपूड (Black pepper) किंवा धणे-जिरे पूड देखील टाकू शकता.
पचनासाठी: साजूक तूप आणि हिंगामुळे खिचडी चविष्ट लागतेच, शिवाय मुलांचे पचनही चांगले होते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: चवीला एकदम चटकदार आणि बनवायला अगदी सोपी; फायबरने भरपूर असलेली 'मसाला ओट्स खिचडी'!
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

फराळाची रंगत वाढवण्यासाठी दिवाळीत शेवचे हे वेगवेगळे प्रकार नक्की ट्राय करा

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता निवड प्रक्रियेबद्दल जाणून घ्या

सणासुदीत त्वचेवर आणा नैसर्गिक चमक! चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्किन केअर टिप्स

दिवाळीत फटाक्यांच्या धुराचा डोळे आणि फुफ्फुसांवर होऊ शकतो परिणाम; संरक्षणासाठी जाणून घ्या या महत्त्वाच्या टिप्स!

पुढील लेख
Show comments