deepawali
✕

जागतिक महिला दिन विशेष ‘ती’

Updated: मंगळवार, 5 मार्च 2019 (09:53 IST)

या जगात प्रवेश केल्यावरही ‘भय इथले संपत नाही’ अशी स्थिती असते. घरातल्या जवळच्या नातेवाईकापासून गावच्या   गुंडापर्यंत कुणीही तिच्या ‘वाटेवरच्या काचा’ बनून तिची पावले रक्तबंबाळ करू शकतो. प्राणिजीवन टिपणार्‍या टी.व्ही. वाहिनवरील खूँखार श्वापदेही असे प्रसंग पाहून माना खाली घालतील. तिच्या आयष्यातल्या स्वप्न सोहळा म्हणजे लग्न असेल तर त्यानंतरही तिला ‘तच्या’ आई, बहिणीच्या रोषाला बळी पडावे लागते. त्यांची लालसा स्टोव्हच्या इंधनापेक्षा जास्त ज्वालाग्राही बनते व असे अनेक स्टोव्ह भडका उडवून तिच्या स्वप्नांची राख करतात. सासू नावाची स्त्री, सून नावाच्या स्त्रीचा इतका प्राणांतिक दुस्वास का करते, हे मानवजातीला आतापर्यंत न उलगडलेले कोडे आहे!

तिचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे पुरूषी मानसिकता. साबण, चारचाकी किंवा कोणतेही उत्पादन विकण्यासाठी जाहिरातीतले तिचे प्रदर्शन असो, मोबाईलवरून मोबाईलकडे फिरणार्‍या ओंगळवाण्या, गलिच्छ चित्रफिती असोत, त्यातून तो पुरूषी अहंगंडच दिसून येतो. तो भाषेमध्येही कसा उतरला आहे, याचे उदाहरण नुकतेच ऐकावास मिळाले. गोटय़ांच्या खेळात जी गोटी हरते व मार खाते तिला कन्नड भाषेत ‘हेण्णु’ (मुलगी) व जिंकलेला आणि मारणार्‍या गोटीला ‘गंडु’ (मुलगा) म्हणतात.

अशा अनेक शत्रूंना रिचवत, पचवत ‘ती’ तिची लढाई लढत आहे. ती समाजाच्या नीतीमत्तेचा कणा आहे. बेहिशोबी संपत्ती गोळा करणार्‍या नवर्‍याचा हात तिने थांबवला वा मुलींशी बेताल वर्तन करणार्‍या आपल्या मुलाच्या श्रीमुखात भडकावली तर चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही. निसर्गाने तिला ‘प्रेम’ नावाची विलक्षण देणगी दिली आहे. ते तिचे शस्त्र आहे. या शस्त्राने ती अनेक अवघड शल्यकर्मे सहजरित्या पार पाडते. तिच्या शब्दात मंत्राचे सामर्थ्य आहे. या मंत्राने ती अग्नी फुलवूही शकते व विझवूही शकते. त्या मंत्राचा ती कसा उपयोग करते, यावर समाजाचे अस्तित्व अवलंबून आहे. 
 
तिच्या डोळतल अंगाराला कायद्याचे कवच लाभले तर दुष्कर्मे करणारे क्रूरकर्मा निश्चितच पुढे येण्यास कचरतील. ज्ञानदेव म्हणतात की, ‘स्त्री-पुरूषन्नामभेदे। शिवपण एकले नांदे।’ म्हणजे शिवशक्तींचे स्वरूप वरून जरी दोन दिसत असले तरी त्यांचे तत्त्व एकच आहे. स्त्री-पुरूष समानता याच्यापेक्षा सोप्या व वेगळ्या शब्दात सांगता येणार नाही. अर्थात हा विचार समाजात रूजायला आणखी किती दिवस लागतील, हे सांगता येत नाही.

तिच ‘अर्ध्या आभाळा’तला श्रद्धेचा, विश्वासाचा सूर्य कधीच न मावळो हीच या जागतिक महिला दिनानिमित्त तिला शुभेच्छा!! 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

दिवाळीत डोळे दिसतील अधिक सुंदर! परफेक्ट आय मेकअप करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

Kojagiri Purnima 2026 Wishes in Marathi कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा

दमा आणि ब्राँकायटिसची लक्षणे सारखीच? दोन्ही आजारांमधील महत्त्वाचे फरक जाणून घ्या

जिममध्ये जायला वेळ नाही? रोज फक्त १५ मिनिटे घरी करा हे ५ सोपे व्यायाम

मैत्रीची परीक्षा; बकरी आणि तिच्या मित्रांची लघु कथा

पुढील लेख
Show comments