शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (17:31 IST)

आईसाठी गुलाब; भावनिक कथा

rose
एकेदिवशी वाटेत फुलांचे दुकान बघून एका माणसाने गाडी थांबवली आणि दुकानदाराकडे जाऊन आईसाठी बुकेचं ऑर्डर देत कुरियरने ते पाठवण्याची विनंती केली. तेवढ्यात तेथे एक लहानशी मुलगी आली आणि त्या माणसाला म्हणाली, "काका, मला माझ्या आईसाठी लाल गुलाब विकत घ्यायचे आहेत पण माझ्याकडे 2 रुपये कमी आहेत, म्हणून तुम्ही मला 2 रुपयांची मदत केलीत तर माझ्यासाठी हे शक्य होईल. 

हे ऐकून ती व्यक्ती हसली आणि लगेच 2 रुपये काढून दिले. मग ती व्यक्ती फुलांची ऑर्डर देऊन निघू लागली तेव्हा ती मुलगी म्हणाली तुम्ही पुढे जात आहात 
 
तर मला तुमच्या गाडीत बसवून आपल्या आईजवळ सोडाला का?
मग त्या व्यक्तीने त्या मुलीला आपल्या गाडीत बसवले आणि काही वेळ चालल्यानंतर ती मुलगी एका कबरस्थानाजवळ थांबली आणि म्हणाली थांबा येथेच माझी आई आहे. 
 
यानंतर ती मुलगी कबरस्थानात जाऊ लागली, मग कुतूहल म्हणून ती व्यक्तीही त्या मुलीच्या मागे गेली, मग ती मुलगी एका कबरवर फुले सजवत असल्याचे दिसले. हे बघून त्या व्यक्तीचे डोळे उघडले, त्याला आता समजले की आपल्या प्रियजनांना गमावणे म्हणजे काय असते आणि तो माणूस लगेचच फुलांच्या दुकानात गेली आणि त्याचे कुरियरने पाठवले ऑर्डर रद्द करून स्वतः फुलांचा गुच्छ घेऊन स्वतःच्या हाताने आईला द्यायला निघाला.
 
नैतिक शिक्षण :- 
आपलं आयुष्य छोटं आहे, जो तुमचा आहे त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा कारण प्रत्येकाला आपल्या प्रेमाची गरज असते आणि आपण तसे करण्यास उशीर करतो. जेव्हा आपण आपल्या प्रियजनांपासून दूर जातो आणि नंतर प्रियजनांचे प्रेम मिळणे अशक्य होते, म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षणात जीवनाचा आनंद घ्या कारण आपल्या कुटुंबापेक्षा दुसरे काहीही महत्वाचे नाही.