1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified बुधवार, 13 जानेवारी 2021 (16:22 IST)

अभिनेता सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट, कारण अस्पष्ट

अभिनेता सोनू सूदने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती हे अजून समोर आलेलं नाही. बृहन्मुंबई महानगरपालिका ने सोनू सूदचं निवासस्थान बेकायदा असल्याचं सांगत त्याला नोटीस बजावली आहे.  यानंतर बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. गेल्या आठवड्यात सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयासमोर अर्ज दाखल केला होता, ज्याला बीएमसीने ऑक्टोबर २०२० मध्ये बजावलेल्या नोटीस आणि दिवाणी कोर्टाने बजावलेल्या आदेशाला आव्हान दिलं होतं. बीएमसीच्या कारवाईविरोधात सोनू सूदच्या इमारतीला 13 जानेवारीपर्यंत कोर्टाने अंतरिम संरक्षण दिले होते.
 
'बेकायदा बांधकामप्रकरणी अभिनेता सोनू सूदला वारंवार नोटीस बजावण्यात आली. कारवाई देखील करण्यात आली. मात्र तरी देखील सोनू सूदनं कायद्याचं उल्लंघन करणं थांबवलेलं नाही. त्यामुळे तो वारंवार कायदे मोडणारा गुन्हेगारच असल्याचा दावा' बीएमसीनं हायकोर्टात केलाय. तसंच सोनू सूदला कुठलाही दिलासा देऊ नये अशी मागणी देखील केली आहे.