1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (23:00 IST)

राज्यातील 18 महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू

मुंबई, पुणे, नागपूर, ठाण्यासह राज्यातील 18 महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या महानगरपालिकांचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने पत्र पाठवले आहे. निवडणूक आयोगाने 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या महानगरपालिकांच्या आयुक्तांना हे पत्र पाठवले आहे. यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी- निजामपूर, मीरा-भाईंदर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांचा समावेश आहे.
 
या सर्व महापालिकांची लोकसंख्या आणि व्यापकता लक्षात घेता निवडणुका वेळेवर घेण्यासाठी आत्तापासूनच प्रकार प्रभाग रचना करणे आवश्यक असल्याच्या निवडणूक आयोगाच्या महापालिका आयुक्तांना सूचना आहेत.
 
राज्य सरकारने बहुसदस्य प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्य प्रभाग पद्धत लागू केली आहे त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असणार आहे. यापूर्वी काही महापालिकांमध्ये प्रत्येक प्रभागात किमान ३ सदस्य होते.