रविवार, 25 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 9 मे 2021 (12:27 IST)

एका दिवसात कोरोना बरा करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल

मुंबईच्या अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरजवळ असलेल्या वांगणीमधील खाजगी दवाखान्यातील डॉ. उमाशंकर गुप्ता यांनी अजब दावा केला आहे.डॉ. उमाशंकर गुप्ता आणि त्याच्या महिला सहकारी डॉक्टर यांनी आपण एका दिवसात कोरोनाबाधित रूग्ण बरा केल्याचं म्हटलं होतं. यासंदर्भात एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.त्यामुळे त्यांच्या दवाखान्यातील गर्दी ही मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती. मात्र या प्रकरणाची आरोग्य विभागाने दखल घेतली.
डॉ गुप्ता यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग ठाणे यांची कोणतीही परवानगी नसताना वांगणी येथे आपले क्लिनीक सुरू ठेवलं होतं. कोरोना काळात कोणतेही नियम न पाळता, मास्क न लावता, सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेत नसल्याचा ठपका ठेवत डॉक्टरवर बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अंबरनाथचे डॉ. सुनील बनसोडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.