शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 17 मे 2022 (15:43 IST)

आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. एसटीने दिलेल्या धडकेमुळे जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारचा चक्काचूर झाला आहे. मुंबई पुणे महामार्गावर हा अपघात झाला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर आमदार जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारला एसटीने धडक दिली. या अपघातात आमदार जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला. दरम्यान, या अपघातातून जगताप थोडक्यात बचावले आहेत. त्यांना मुंबईकडे नेण्यात आलं आहे.
 
आमदार संग्राम जगताप आपल्या बीएमडब्ल्यू कारने मुंबई-पुणे महामार्गावरुन जात होते. यावेळी मंगळवारी सकाळी 5.30 वाजता त्यांच्या गाडीला एसटीने धडक दिली. या घडकेत त्यांची कार चक्काचूर झाली. या अपघातात आमदार संग्राम जगताप यांना कुठलीही दुखापत झालेली नाही.