गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 17 मे 2022 (14:26 IST)

लग्नात नवरीने घेतली बैलगाडीतून एंट्री

आपल्या लग्नात नवीन जोडपे काही वेगळे करू इच्छितात. त्या साठी अमाप खर्च करतात. सध्या नवरा नवरी अतिशबाजीतून मंडपात येतात. तर कोणी आकाशातून कोणी बग्गीतून एंट्री करतात. पण आत्ताच्या आधुनिक आणि देखावा करण्याच्या काळात साधेपणाने जगणारी माणसे देखील आहेत. आपल्या कडे जे असेल त्यातून करून निघणारी काही माणसं  देखील आजच्या काळात आहे. सध्या सोशल मीडियावर बैलगाडीतून एंट्री घेणाऱ्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये नवरीने चक्क बैलगाडीतून लग्नमंडपात एंट्री केली आहे.

हा विवाह सोहळा हे ठाणे जिल्ह्यातील दिव्यामधील दातिवली गावातला. या गावातील सुनील पाटील यांचा कन्येचा विवाह शनिवार रोजी झाला. या विवाह सोहळ्यात नवरी मुलगी हेमांगी हिने चक्क बैलगाडीतून लग्नमंडपात एंट्री केली. तिला सर्व वऱ्हाडी आणि नातेवाईक आश्चर्याने पाहतच राहिले. वऱ्हाडी मंडळीने तिचे तलावाजवूं स्वागत आणि कौतुक केले. गावातल्या या नवरीच्या या एन्ट्रीची चर्चा सर्वत्र होत आहे.