सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (16:41 IST)

आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

suicide
मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मुंबईतील एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी कॅम्पसमधील वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी ही माहिती दिली.
 
पोलिसांनी सांगितले की, हा विद्यार्थी अहमदाबादचा रहिवासी असून तो बीटेक (केमिकल) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कॅम्पसमधील सुरक्षा रक्षकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुण दिसल्यावर ही घटना उघडकीस आली.
 
त्याने सांगितले की मृताने कोणतीही 'सुसाइड नोट' सोडली नाही आणि प्रथमदर्शनी त्याने वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली होती.
 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत म्हणाले, “प्राथमिक माहितीच्या आधारे आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाची तपासणी सुरू आहे.''