सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified गुरूवार, 14 जानेवारी 2021 (16:01 IST)

मांजरीला वाचण्याचा प्रयत्नात भीषण अपघात

मुंबईतील मलबार हिल परिसरात भीषण अपघात झाला आहे. यात मांजरीला वाचवण्यासाठी भरधाव वेगात असलेली मर्सिडीज कार डिव्हायडरवर आदळली. मांजरीला वाचण्याचा प्रयत्न करताना कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार डिव्हायडरवर जाऊन धडकली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 
 
या घटनेत मलबार हिल परिसरात मर्सिडीज कार डिव्हायडरवर आदळली. यावेळी कारमध्ये दोघे जण होते, मात्र कोणालाही दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार कारसमोर अचानक मांजर आल्यामुळे तिला वाचवण्याच्या प्रयत्नात कारवरचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर मर्सिडीज कार डिव्हायडरवर चढली आणि हा अपघात झाला.