रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (07:06 IST)

राज ठाकरे यांच्यासाठी अजमेर शरीफच्या दर्ग्यात दुआ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाताला टेनिस खेळताना हेअरलाइन फ्रॅक्चर झाले आहे. आता अजमेर शरीफच्या हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यामध्ये देखील राज ठाकरे यांच्यासाठी दुआ मागण्यात आली आहे. अजमेर शरीफच्या दर्ग्याचे व्यवस्थापक सय्यद फरहद यांनी याबाबतचा एक व्हिडिओच शेअर केला आहे. 
 
"मला मुंबईहून फोन आला आणि कळलं की तुमच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे. मी आता अजमेर शरीफच्या हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यात आहे. मी इथं तुमच्यासाठी दुआ करत आहे. मालिक तुम्हाला स्वस्थ आणि तंदुरुस्त ठेवो. तुम्हाला लवकर बरं करो", असं सय्यद फरहद यांनी म्हटलं आहे. 
 
दोनच दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याशीही बोलणं झालं त्यावेळीही राज ठाकरे यांचा उल्लेख झाला होता, असंही सय्यद यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.