रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (08:30 IST)

मुंबईत पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढली

मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत होती. मात्र संख्या मुंबईच्या चिंतेत आणखी भर पाडत आहे. मुंबईत पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढली आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. मुंबईत गुरुवारी १ हजार ४२५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण ५९ जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत गुरुवारी केवळ १ हजार ४६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रोज रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या ही ४ हजारांच्या वर असते. आज हा आकडा फारच खाली कोसळला आहे .
 
मंबईत एकूण २९ हजार ३९१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १ हजार ४२५ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. मुंबईत सध्या २९ हजार ५२५ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ६९ लाख ३ हजार ६६४ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत १४ हजार ४६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत १३ मे ते १९ मे पर्यंतचा विचार केला असता कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.२३ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या २७६ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. तर ७३ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत.