गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified सोमवार, 31 मे 2021 (07:33 IST)

हॉटेलला ऑफर पडली महागात, महापालिकेने टाकली धाड

'लस घ्या आणि आमच्याकडेच आराम करा' अशा पद्धतीची ऑफर मुंबईच्या अंधेरीतील ललितने हॉटेलने दिली आहे. या ललित हॉटेलमध्ये मुंबई महापौर किशोरी पेडणेकरांनी धाड टाकली आहे. हॉटेलकडून लस घ्या आणि हॉटेलमध्ये आराम करा आशा आशयाच पॅकेज दिलं जात आहे. 3500 ते 4000 रुपये आशा प्रकारचं हे पॅकेज या ललित हॉटेलने दिले. हे पॅकेज आक्षेपार्ह आहे असं महापौर यांनी सांगण्यात आले आहे. 
 
सोशल मिडियावर हे पसरलंय यामुळे याला विरोध केला जात होता. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा जाणवत असताना एका हॉटेल अशा प्रकारची ऑफर देणं अतिशय चुकीचं आहे. सोशल मीडियावर या पॅकेजवर आणि सरकारवर टीका करण्यात आली.