'त्या' अल्पवयीन आरोपीनेच केले होते सर्वाधिक अत्याचार
दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेवर सर्वाधिक अत्यचार 'अल्पवयीन' आरोपीनेच केले होते, अशी माहिती समोर आली आहे. हा आरोपी स्वत:ला अल्पवयीन सांगत आहे. त्याच्या हाडांची तपासणी करण्यात आली आहे. अस्थी धनता चाचणी करण्यात आली असून, या चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याचे वय स्पष्ट होणार आहे. पीडितेवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या अल्पवयीन आरोपीने तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला होता. एवढेच नव्हे, तर ज्या जखमांमुळे ती प्रणाला मुकली, त्या जखमाही त्यानेच दिल्या होत्या. हा आरोपी स्वत:ला अल्पवयीन सांगत आहे. त्यानेच तिच्यावर बलात्कारानंतर लोखंडी रॉड निर्दयीपणे घुसविला होता. पीडित मुलगी आणि तिच्या मित्राला बसबाहेर फेकून देण्याची धमकी दिली होती. हाच संपूर्ण घटनेचा सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. लोखंडी रॉडमुळे पीडितेचे आतडेच बाहेर निघाले. अंतर्गत जखमा एवढ्या गंभीर होत्या, की रक्तस्त्राव थांबता थांबत नव्हता. शस्त्रक्रिया करून तिचे आतडे काढण्यात आले होते, परंतु ती मृत्यूशी लढा जिंकू शकली नाही.