गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

स्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या अपघातात चालकासह  १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर  काही लोक जखमी झाले आहेत. कुशीनगरच्या डिव्हाईन मिशन स्कूलचे विद्यार्थी स्कूल व्हॅनमधून जात होते. ती  व्हॅन मानवरहित रेल्वे क्रॉसिंग पार करत होती. यावेळी वेगाने आलेल्या पॅसेंजर ट्रेनने स्कूल व्हॅनला उडवलं आणि यात अकरा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. शिवाय जखमींना मोफत उपचार आणि योग्य ती मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली असून घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.