शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑक्टोबर 2024 (09:46 IST)

तलावात बुडून 3 मुलींचा मृत्यू

Death
छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींसह तीन मुलींचा मृत्यू झाला असून पोलिस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. तसेच सिहावा पोलीस स्टेशन हद्दीतील बेलेर गावात तलावात बुडून मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
मिळालेल्या माहितीनुसार गावातील तीन मुली सकाळी आंघोळीसाठी गेल्या असतांना हा अपघात घडला असून याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालीत. तसेच एक मुलगी खोल पाण्यात बुडत असतांना तिला वाचवण्यासाठी आणखी दोन जणही पाण्यामध्ये उरल्यात आणि त्यांचाही बुडून मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तिघींचा मृतदेह बाहेर काढले. 
 
माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकारींनी सांगितले. 

Edited By- Dhanashri Naik