शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (17:46 IST)

शिक्षकाच्या मारहाणीत पाचवीतील विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू

शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नातेच वेगळे असते.असं म्हणतात की, आई नंतर गुरुला मोठं स्थान दिले आहेत. शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला घडवतो. आणि पायावर उभे राहण्याचा ज्ञान देतो. मात्र शिक्षक अनेकदा असेही करतात जे धक्कादायक असत.अशीच घटना दिल्लीच्या ग्रेटर नोएडातील गौतम बुद्ध नगरमधील बदलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बंबवाड गावात असलेल्या पब्लिक स्कूलमध्ये घडली. या शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेच्या शिक्षकाने मारहाण केली, त्यानंतर उपचारादरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटने नंतर आरोपी शिक्षक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. घटनेची नोंद करून पोलीस तपास करत आहेत.   
 
मिळालेल्या माहितीनुसार, बदलपूर पोलिस स्टेशन हद्दीतील बंबावड गावात राहणाऱ्या मीनाक्षीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, तिचा मुलगा प्रिन्स देवदत्त(12 वर्षे) हा बंबावाड येथील कॅप्टन सावरियान पब्लिक स्कूलमध्ये पाचवीत शिकत होता. शुक्रवारी प्रिन्सला परीक्षेत नापास झाल्यामुळे शिक्षकांनी मारहाण केली. त्यात तो शाळेतच बेशुद्ध पडला.त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पालकांचा संताप झाला आणि त्यांनी आरोपी शिक्षकाला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली. हा शिक्षक क्षुल्लक गोष्टीवरून मुलांना मारहाण करतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत शाळेत अनेकदा तक्रार करूनही शाळा प्रशासनाने कोणतीही कठोर कारवाई केली नाही.घटनेची नोंद केल्यानंतर बदलपूर पोलीस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहे.आरोपी शिक्षक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 
 
Edited By - Priya Dixit