रेशनकार्ड धारकांसाठी केंद्र सरकार कडून मोठी घोषणा
रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे. रेशनकार्ड वर मोफत रेशन घेत असणाऱ्यांसाठी सरकारने शिधा पत्रिका आधारकार्डशी लिंक करण्याचे आदेश देण्यात दिले होते. लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 होती. आता सरकारने आधार कार्ड आणि रेशनकार्ड लिंक करण्याची तारीख वाढवून 30 जून करण्यात आली आहे. या तारखे पर्यंत रेशनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करू शकाल.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने आधार आणि रेशनकार्ड लिंक करण्यासाठी तारीख वाढवण्याची अधिसूचना जारी केली असून आता केंद्र सरकार ने लिंक करण्याची तारीख 30 जून 2023 केली आहे. रेशनकार्डला सरकारने वन नेशन वन रेशन याआधारे रेशनकार्ड आधारकार्डाशी जोडण्यावर भर दिला जात आहे.
आधार-रेशन कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया -
सर्वप्रथम राज्याच्या अधिकृत सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) पोर्टलला भेट द्या.
सक्रिय कार्डसह आधार लिंक निवडा.
तुमचा रेशन कार्ड नंबर टाका आणि त्यानंतर आधार कार्ड नंबर द्या.
तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका.
सुरू ठेवा/सबमिट करा बटण निवडा.
आता तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर एक ओटीपी मिळेल.
आधार रेशन लिंक पेजवर OTP एंटर करा आणि तुमची विनंती आता सबमिट केली गेली आहे.
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला त्याबद्दल माहिती देणारा एसएमएस प्राप्त होईल.
Edited By- Priya Dixit