सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भाजपाला सासो की जरुरत है जैसे

सासो की जरुरत है जैसे आशकी के लिये ..हे गान ज्यांना माहित आहेत आहे त्यांना राहुल रॉय माहित असेल. त्या काळातील सर्वाधिक चालणारा आणि सुपर डुपर हिट चित्रपट होता तो आशिकी होय. यामध्ये काम केलेला प्रसिद्ध अभिनेता राहुल रॉयने राजकारणात प्रवेश केला असून  केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीत त्याने  भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राहुल म्हणतो की आज मी प्रवेश केला हा दिवस महत्त्वाचा दिवस आहे. मी  भाजपचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही कामे करत आहेत  आपल्या देशाला पुढे नेत आहेत, आणि ज्याप्रकारे गेल्या दोन वर्षात जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, त्यामुळे मला फार अभिमान वाटतो आहे.  भाजपप्रवेशाचा निर्णय घेऊन मी फार समाधानी आहे. मला भाजपा  पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती मी पूर्ण करणार आहे. 1990 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी राहुल रॉयने ब्लॉकबस्टर सिनेमा ‘आशिकी’तून बॉलिवूडमध्ये पदार्पण  जुनून, फिर तेरी कहानी याद आयी यासारख्या सिनेमातही अभिनय केला. राहुल रॉय हा सुपर स्टार नंतर सुपर डुपर फ्लॉप अभिनेता ठरला आहे.