रेल्वे तिकिटांवर सूट रद्द
रेल्वेत होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सर्व कोट्यातील तिकिटांवर मिळणारी सूट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत कोट्यातील कोण्याताही तिकिटावर सूट मिळणार नाही, हे स्पष्ट करणत आले आहे.
दरम्यान, विद्यार्थी, दिव्यांग नागरिक त्याचप्रमारे 11 प्रकारच्या रुग्णांना मिळणारी सूट कायम ठेवण्यात आली आहे. रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हारसचा प्रसार रोखण्यास यामुळे मदत होईल.