रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करतं होतं प्रेमी जोडपं, केक खाऊन प्रेयसीचा मृत्यू झाला

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये नगर कोतवाली भागात एका हॉटेलमध्ये एक तरुणीची संशयास्पद परिस्थितीत मृत्यूची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पूर्ण क्षेत्रात खळबळी उडाली आहे.
 
पोलिसांनी मृत देह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. तरुणी हॉटेलमध्ये आपल्या प्रियकरासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. त्यांनी स्वत:ला विवाहित सांगितले होते.
 
पोलिसांप्रमाणे हिरद्वारच्या जवळ एका गावात राहणारं एक प्रेमी जोडपं सकाळी 9 वाजेच्या सुमारास कोतवाली येथील एका हॉटेलमध्ये पोहचलं होतं.
 
माहितीप्रमाणे दोघांनी हॉटेलमध्ये दुपारी वाढदिवसाचा केक कापून खाल्ला. या दरम्यान तरुणीचा अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
 
अचानक असे घडल्यामुळे तरुण घाबरुन ओरडू लागला. त्यामुळे हॉटेल कर्मचारी खोलीत आले. त्यांच्या सूचनेवर पोलिस घटनास्थळावर पोहचली आणि मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठविण्यात आले.
 
दोघांच्या नातेवाईकांना सूचित केले गेले आहे तसेच तपासण्यासाठी केक सोबत नेण्यात आले आहे. पोस्टमार्टमाच्या रिपोर्टनंतरच मृत्यूचे खरे कारण कळू शकेल.