रविवार, 10 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 31 जानेवारी 2019 (09:00 IST)

गुजरातच्या शिक्षण मंत्र्यांचा प्रताप, आसाराम बापूला पत्र लिहून दिल्या शुभेच्छा

गुजरातचे शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चूडासमा यांनी बलात्कारच्या आरोपाखाली दोषी असलेल्या आसाराम बापूला पत्र लिहून त्याच्या संस्थेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आसारामच्या योग वेदांत सेवा समितीद्वारा १४ फेब्रुवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या मातृ-पितृ दिवसांची प्रशंसा केली आहे. भूपेंद्र सिंह चूडासमा यांनी लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून गुजरात सरकारसाठी हे वादाचे कारण ठरत आहे.
 
भूपेंद्र सिंह यांनी पत्रासाठी अधिकृत लेटरहेडचा वापर केला आहे. यावर त्यांचा फोटो आणि मंत्रालयाचे नाव देण्यात आले आहे. त्यांनी पत्रात 'तुमची संस्था १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ-पितृ दिवस म्हणून साजरा करून प्रशंसनीय काम करत आहे. जे आई-वडिल आणि गुरूंची सेवा करतात ते चांगले नागरिक बनतील' असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.