शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: चंदिगड , शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (10:07 IST)

आता हनिप्रीतची न्यायालयीन कोठडीत रवानगी

राम रहीम प्रकरणी गेल्या आठवड्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या हनिप्रीतला पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर,आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने हनिप्रीत आणि तिची साथीदार सुखदीप कोर हिला 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे .राम रहिमला अटक केल्यानंतर पंचकुलात उसळलेल्या हिंसाचारात हात असल्याचा हनिप्रीतवर आरोप आहे.हनिप्रीत गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी आहे. राम रहीम साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.