शुक्रवार, 17 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (07:27 IST)

एवढी संवेदनशील माहिती अर्णब यांना कळालीच कशी?, अनिल देशमुख यांचा सवाल

रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी अध्यक्ष पार्थ दासगुप्ता यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे प्रकरण  आता सरकार गंभीर झाले आहे. बालाकोट येथील हल्ल्याबाबतची माहिती अर्णब यांना अगोदरपासून होती, एवढी संवेदनशील माहिती अर्णब यांना कळालीच कशी? असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. तसेच, याप्रकरणी मंगळवार कॅबिनेटची बैठक देखील बोलावण्यात आली असून, त्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचंही देशमुख यांना सांगितलं आहे.
 
अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हायरल झालेल्या संभाषणाची आम्ही संपूर्ण माहिती मिळवत आहोत. त्यात काही बालाकोट एअर स्ट्राईक व पुलवामा हल्ल्या सारख्या संवेदशनील बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. असेही अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.