गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मे 2024 (15:20 IST)

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

केरळ मधील कोझिकोडच्या सरकारी कॉलेजमध्ये सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये बेजवाबदारपणाचे प्रकरण समोर आले आहे. चार वर्षाच्या एका चिमुकीच्या हाताचे अतिरिक्त बोट काढण्याची सर्जरी होणार होती. तर डॉक्टरांच्या टीमने चिमुकल्याच्या जिभेचे ऑपरेशन केले. चुकीची सर्जरी करणारे एसोसिएट प्रोफेसर डॉ बेजॉन जॉनसन यांना प्राथमिक रिपोर्टच्या आधारावर निलंबित करण्यात आले आहे. 
 
आरोग्य मंत्री विना जॉर्ज यांनी DME ला चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. पोलिसांनी आई-वडिलांनी नोंदवलेली तक्रार वर IPC धारा 336 कलाम नोंदवला आहे.  
 
कोझिकोड जवळ चेरुवन्नूरची राहणार्या या मुलीला तिच्या तोंडात कापसाचा बोळा टाकून ऑपरेशन थेटरच्या बाहेर आणण्यात आले. जेव्हा कुटुंबीयांनी पाहिले की, बोट आजून तसेच आहे. तिच्या आई वडिलांनी ही गोष्ट डॉक्टरांना सांगितली. मग परत तिला OT मध्ये नेण्यात आले. व ऑपरेशन करून तिचे बोट काढण्यात आले. सर्जनने या बेजवाबदारपणाचे वेगळेच स्पष्टीकरण दिले आहे. डॉक्टर जॉनसन याने त्या मुलीच्या आईवडिलांना सांगितले की तिच्या जिभेमध्ये  टाई होता त्यामुळे तुमचा निर्णय न घेता तिची सर्जरी केली. 
 
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, तिच्या जिभेमध्ये कोणतीही समस्या नव्हती. पण रुग्णालयाच्या अधिकारींनी सांगितले की सर्जनने त्यांना मुलीच्या जीभेबद्दल सांगितले होते आणि हे चुकीच्या ओळखीचे प्रकरण आहे. आईएमसीएचचे अधीक्षक डॉ अरुण प्रीतने आपल्या प्राथमिक रिपोर्ट मध्ये सांगितले की, परवानगी घेतली नाही  ही सर्जनची चूक आहे.