शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जयंत सिन्हा मोदी सरकारच्या पाठिशी

यशंवत सिन्हा यांच्या टीनेनंतर त्यांचां मुलगा आणि भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा मोदी सरकारच्या पाठिशी उभे राहिले आहेत. नोटाबंदी, जीएसटी, डिजिटल पेमेंट यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. देशातील जनतेला या निर्णयाचा लाभ मिळेल, अशा शब्दांमध्ये जयंत सिन्हा यांनी मोदी सरकारच्या कामाचं कौतुक केलं आहे. जयंत सिन्हा यांनी वडिल यशवंत सिन्हा यांचे नाव न घेता त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
 
नोटाबंदी, जीएसटीवरुन यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका केली होती. अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, असा हल्लाबोल त्यांनी केला होता. या टीकेलाही जयंत सिन्हा यांनी उत्तर दिले. ‘अर्थव्यवस्थेच्या ढाच्यात बदल करुन नवा भारत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे लोकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. नवी अर्थव्यवस्था पारदर्शक आणि जगासोबत चालणारी असेल. यामुळे लोकांचे जीवनमान उंचावेल. जीएसटी, नोटाबंदी आणि डिजिटल पेमेंटमुळे अर्थव्यवस्थेचा चेहरा बदलेल,’ असंही जयंत सिन्हा यांनी म्हंटलं आहे.