मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 12 मे 2018 (08:54 IST)

कर्नाटकात मतदानाला सुरुवात

कर्नाटकमध्ये  विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान सुरु रहाणार आहे. १५ मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या  एकूण २२२ जागांसाठी  मतदान होत आहे. ४ कोटी ९६ लाख मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क जावणार आहेत. हे मतदान ईव्हीएम मशीनवर होतंय. वाढत्या तापमानामुळे मतदानाच्या वेळेत एक तासाने वाढण्यात आला आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान कर्नाटकमधील आर.आर. नगर विधानसभा मतदार संघातील निवडणूक कर्नाटक निवडणूक आयोगानं १२ मे ऐवजी २८ मे रोजी घेण्याचं ठरवलंय. ३१ मे रोजी इथं मतमोजणी होईल. इथल्या जलाहल्लीतील एका फ्लॅटमध्ये  गेल्या मंगळवारी १० हजार बानवट निवडणूक ओळखपत्र जप्त करण्यात आली. त्यामुळे निवडणूक आयोगानं इथलं मतदान पुढे ढकलले आहे. या निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तर भाजपला रोखण्याचं काँग्रेसपुढे आव्हान असणार आहे.