दिल्लीत होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनामुळे मुंबई राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द
दिल्लीला ये-जा करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे.घरातून निघण्यापूर्वी तुमच्या ट्रेनची स्थिती नक्की तपासा, कारण मुंबई राजधानी, पाटणा-दिल्ली तेजस राजधानी आणि अमृत भारत एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनांचा रेल्वे प्रवासी वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर पोहोचताना अडचणी येऊ नयेत आणि वाहतूक कोंडीमुळे त्यांच्या गाड्या चुकवू नयेत, हे सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या आदेशानुसार, पहाटे ४:०० ते दुपारी २:०० दरम्यान नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या त्यांच्या मूळ स्थानकांवरच रद्द केल्या जातील. .
रेल्वे कोचिंग संचालनालयाने ९ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेनंतर आपल्या मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या आणि १० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते दुपारी २ वाजेदरम्यान नवी दिल्ली किंवा हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात येतील. तसेच मुंबई राजधानी एक्सप्रेस, तेजस राजधानी एक्सप्रेस, संपूर्ण क्रांती सुपरफास्ट, अमृत भारत एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.
गाड्या रद्द करण्याचा निर्णय का घेण्यात आला?
रेल्वेच्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर रोजी मध्य दिल्लीत होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनामुळे नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांच्या आसपासच्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वेने या काळात दिल्लीत येणाऱ्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या त्यांच्या मूळ स्थानकांवरून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.