रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (09:38 IST)

त्यांना भान राहिले नाही, नवज्योत होत्या रुग्णालयात

पंजाब येथे मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील जोडा बाजार येथील रावण दहन पाहणाऱ्या लोकांना शुक्रवारी दोन रेल्वेंनी चिरडले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघातानंतर रेल्वे पटऱ्यांवर 150 मीटर परिसरात मृतदेहच पडलेले होते. ते पाहून 1947 च्या फाळणीचा काळ आठवला.
 
रावणदहनाचा कार्यक्रम सुरु झाला आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात फटाके फुटायला सुरुवात झाली. त्यावेळी या आतिषबाजीमुळे आपल्याला काही धोका होईल, असे बऱ्याच जणांना वाटले. त्यामुळे बरेच लोकं मागे सरकले आणि ते रेल्वे ट्रॅकवर पोहोचले. रेल्वे ट्रॅकवरून रावणदहन पाहण्यात लोकं रमली होती, पण आपण रेल्वे ट्रॅकवर उभे आहोत, याचे भान त्यांना राहिले नाही. काही वेळाने एक एक्स्प्रेस या ट्रॅकवर आली आणि किमान 50 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे, अशी माहिती एका प्रत्यदर्शीने स्थानिक वृत्तवाहिनीला दिली. मात्र नवज्योत सिंग यांच्या पत्नीवर पळून गेले असा आरोप झाला मात्र त्या जखमींची मदत करत होत्या आणि रुग्णालयात देखील उपस्थित होत्या असे समोर आले आहे.