सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 मे 2020 (08:38 IST)

जेईई आणि नीट परीक्षांच्या नव्या तारखा येत्या ५ मे रोजी जाहीर होणार

जेईई आणि नीट परीक्षांच्या नव्या  तारखा येत्या ५ मे रोजी जाहीर केल्या जाणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं म्हटलं आहे.

कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी देशभर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. येत्या ५ मे रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधून परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करणार आहेत.