रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, 2 जवान शहीद

पाकिस्ताननं शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय सैन्यांच्या चौकीवर भ्याड हल्ला चढवला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाले आहेत. 
 
जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्ण घाटीमधील ही घटना आहे. दरम्यान, 27 एप्रिल रोजी काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात पंझगाम येथील लष्करी तळावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका कॅप्टनसह तीन जवान शहीद, तर पाच जण जखमी झाले. लष्कराने केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन अतिरेकी ठार झाले होते.